शिंदखेडा राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. या संकटातून कसा मार्ग काढावा, याचा काही पर्याय सुचत नसुन दुबार पेरणी झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत हातनुर, विखरण (देवाचे), शिंदखेडा शहर, जनता नगर भागातील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
दुबार पेरणीच्या संकटावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष असुन लवकरच उपाययोजनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी सांगितले. शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण व नगरपालिकेच्या वार्डा-वार्डात सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानाचा (दि.15) रोजी चौथा दिवस होता. या अभियानाला शेतकरी, ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या बैठकांमध्ये जनता आपल्या समस्या मांडत आहेत.
तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काय करावे, या संकटातुन मार्ग कसा काढावा, काही पर्याय सुचत नसुन दुबार पेरणी करावी लागल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही, असा सुर शेतकऱ्यांमधून उमटला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, महिला संघटीका ज्योतीताई पाटील, चंद्रसिंग ठाकूर, स्वीय सहाय्यक दिपकराव जगताप, रुपेश मराठे, हातनुरचे माजी सरपंच साहेबराव पाटील, माजी सरपंच बन्सीलाल निकम, ग्रा.पं.सदस्य कैलास पाटील, दाजीबा नगराळे, संतोष निकम, भगवान कुमावत, प्रशांत जगताप, प्रविण वाघ, विठ्ठल वाघ, संजय बोरसे, अभिमन्यु निकम, जिजाबराव निकम, शेखर भदाणे, विखरण (देवाचे) येथील डॉ.प्रविण पाटील, संजय पवार, योगेश चित्ते, सुभाष पाटील, कुणाल पाटील, राकेश पाटील, चंद्रसिंग गिरासे, धनंजय सोनार, किशोर मिस्त्री, विजय पाटील, सर्जेराव पाटील, विलास पाटील, जिगर कदम, महेंद्र गिरासे, नारायण पाटील, जगन पाटील, प्रताप गिरासे, नंदकिशोर पाटील, नाथा शिंदे आदी उपस्थित होते.