पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांच्या आदेशानुसार जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा डॉ सुनीता मांडोळे यांची विभागीय संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पी. एच. डी. संपादन केल्याबद्दल डॉ .सुनीता मांडोळे यांचा जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा डॉ .सुलभा कुंवर, विभागीय अध्यक्षा डॉ.उषा साळुंखे व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी यांनी सत्कार केला.
याप्रसंगी डॉ सुलभा कुंवर, प्रदेश उपाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड व डॉ उषा साळुंखे विभागीय अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, सिमा वाघ तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड धुळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ .सुनीता मांडोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडचे ध्येय, धोरण व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, महिलांनी संघटित होऊन अंधश्रद्धा व कर्मकांड यातून मुक्त होऊन निर्भय व्हावे. घराघरातून महिलांचा आदर व सन्मान व्हावा असे सांगितले.
विभागीय अध्यक्ष डॉ. उषा साळुंखे यांनी कुटुंब व्यवस्था आज मोडकळीस निघाली आहे. आज ऑनलाईनचे युग आहे. आपली मुलं मोबाईलवर काय करतात याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगत महिलांना व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले. तसेच ८ मार्च २०२१ला सुरू झालेल्या सुवर्णपंख अँप विषयी माहिती दिली.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, प्रवीण पाटील, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, एस. ए पाटील, भिमराव पाटील, राजेंद्र पाटील, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रतिभा पाटील, जिजाऊ ब्रिगेड सचिव डॉ अंजली शेळके, स्वाती पाटील रंजना गुंजाळ, वर्षा पाटील, नलिनी पाटील, दिपमाला पाटील, सुरेखा पाटील, रंजना ठाकरे, सुनीता वारूळे, संगीता चिंचोले, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका उपाध्यक्षा अमृता मराठे, पुजा निकुभ, योगीता पवार, गौरी पाटील, ज्ञानेश्वरी गुंजाळ आदी उपस्थित होते.