(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) यावल दरोड्यातील एका आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल पोलीस स्टेशनला भाग ५ गु र नं १२१/२०२१ भादवि कलम ३९२ आर्म ऍक्ट ३/२५ वाढीव कलम ३९५ या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी) रा. रोहित नगर भुसावळ याला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी ही कारवाई केली. स फौ अशोक महाजन, शारीफोद्दिन काझी, किशोर राठोड, युनुस शेख, विनोद पाटील, रणजित जाधव आदींनी ही कारवाई केली.