(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) इकरा एज्युकेशन सोसायटी व तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कोरोना काळात अथक परिश्रम लक्षात घेऊन इकरा नॉन कोविड व इकरा हेल्थ केअर सेंटर यशस्वीरित्या चालवले. वाजवी शुल्कात रुग्णांना बरे करणे व त्यासाठी अथक परिश्रम घेणे या कार्याची डॉक्टर आणि कर्मचारी यांची दखल घेऊन इकरा एज्युकेशन सोसायटी तर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान इकरा नॉन कोविडचे प्रमुख डॉ. शोएब शेख, कॅम्पस प्रभारी अफजल शेख, नर्स यास्मिन पटेल, गीता जोशी, वंदना तेलगोटे, लॅब टेक्नीशियन सय्यद मसूर, जावेद शेख, नूर मोहम्मद, अशोक बारी, अरिफ कलंदर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. सरचिटणीस एजाज मलिक डॉ. ताहेर शेख, अब्दुल माजिद जकेरिया, अब्दुल रउफ शेख, जफर अहमद शेख, अब्दुल रशीद शेख, डॉ झबिउल्ला शहा, अब्दुल अजीज सालार, अब्दुल गनी मेमन, अब्दुल नबी बागवान, तारीख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.