(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) धुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी ‘कोविड- 19’ प्रतिबंधक लसीकरण केंद्र कामगारांच्या वेळेचे नियोजन लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांनी कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोविड-१९ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे (धुळे), महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अरुण मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘कोरोना’च्या नोडल अधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी डॉ. प्रज्ञा बडे- मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई, सुरेखा चव्हाण, डॉ. श्रीकुमार चिंचकर, गोविंद दाणेज, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.