(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) अभियांत्रिकी तसेच विविध उच्च व्यावसायीक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या नीट एट्रंन्स एक्झाम सेंटर धुळे शहरात सुरु करण्यास केंद्र शासनाच्या एचआरडी मंत्रायलयाने मंजूरी दिली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ही मंजूरी मिळाली असून यामुळे धुळे जिल्ह्यासह नंदूरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे.
अभियांत्रिकी, तसेच व्यावसायीक पदवी अभ्यासक्रमांसाठी असलेली नीट एंट्रन्स परिक्षा देण्यासाठी उच्च शिक्षण घेवू इच्छिणार्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील हजारो विद्याथ्यार्ंना नाशिक येथे जावे लागत होते. विद्यार्थी, पालकांना यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. गेल्या दिड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना नीट परिक्षेसाठी नाशिक, पुण्याला जाणे अवघड झाले होते. लॉकडाऊन, प्रवास बंदी यामुळे अनेक विद्यार्थी गेल्या वर्षी नीटची परिक्षा देवू शकले नाहीत.
दरम्यान, पालकांनी खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे विनंती करुन नीट परिक्षा केंद्र धुळे जिल्ह्यात सुरु करावे, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्लीतील मानव संसाधन, शिक्षण (एच.आर.डी.) मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्री महोदयांकडे निवदेन देत धुळ्यात नीट परिक्षा सेंटर सुरु करण्यास मंजुरी देण्याची मागणी केली. त्याचा पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्र शासनाकडून नीट परिक्षा सेंटर धुळ्यात सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. लवकरच याविषयी आदेश पारित होऊन धुळ्यात नीट परिक्षा सेंटर सुरु होईल.
धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह शेजारच्या नंदूरबार जिल्ह्यातील विद्याथ्यार्ंना सुध्दा त्याचा फायदा मिळणार आहे. नीट परिक्षेसाठी आता धुळ्यातच सोय होणार असल्याने हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठी सोय होणार असल्याने विद्यार्थी पालक वर्गाने खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.