(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात शिवसेनेची सत्ता असून आता शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तालुक्यात व रावेर विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात शिवसेना शाखा स्थापन करून घरा-घरात शिवसैनिक तयार करा, असे प्रतिपादन लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी केले. रावेर येथे आयोजित शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते.
या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे (रावेर लोक सभा सहसंपर्क प्रमुख) रावेर विधान सभा संपर्क प्रमुख मोहन मसुरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, उपजिल्हाप्रमुख अण्णाभाऊ पाटील, जिल्हा संघटक रवींद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सादर प्रसंगी रावेर तालुका शिवसेना प्रमुख योगीराज पाटील युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित, यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, रावेर तालुका संघटक अशोक शिंदे, मा. यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, यावल उप तालुका प्रमुख विलास चौदरी, रावेर शहर प्रमुख नितीन महाजन, उप शहर प्रमुख संतोष महाजन, रावेर युवा सेना शहर प्रमुख राकेश घोरपडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रल्हाद महाजन यांनी तर सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. आभार योगीराज पाटील यांनी मानले.