(मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा) एकनाथ खडसे आज मुंबई मधून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खडसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार देऊन ‘ईडी चौकशी सुरू असून त्यावर बोलणे त्यावर उचित होणार नाही, चौकशी पूर्ण झाल्यावर मी बोलेल’, अशी प्रतिक्रिया दिली.
एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदी प्रकरणी आरोप झाले आहेत. या जमीन खरेदी प्रकरणी यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे, तर एकनाथराव खडसे यांची नऊ तास चौकशी केली आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना चौकशी संदर्भात समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे खडसे व त्यांच्या कुटुंबीयांभोवती ईडी चौकशी वाढतच आहे. चौकशीनंतर दिनांक १७ जुलै रोजी ते मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊसवर आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.