(राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज सुमारे एक तास चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत राजकारणावर काय चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकला नाही. चर्चेदरम्यानचे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये याविषयी कमालीचे औत्सुक्य वाढले असून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दोघांच्या या भेटीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.