(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) पारोळा तालुक्यातील खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आरटीइ योजनेअंतर्गत प्रलंबित प्रतिपूर्ती रकमेसाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले.
२०१८-१९ पासून आर टी इ प्रतिपूर्तीची रक्कम शासनाने शाळांना आधार केली नाही. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा सर्व निधी देखील प्राप्त झालेला आहे. मात्र सदर रक्कम अजूनही प्रलंबित आहे. त्याचबरोबर कारोना व लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत इंग्रजी खाजगी शाळांची परिस्थिती बिकट आहे व शाळांना कुठलीही शासनाची आर्थिक मदत नाही. शैक्षणिक शुल्क वसुली वरही शासनाने निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग व महाराष्ट्र शासन सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांची ही प्रलंबित रक्कम देखील अदा करत नाही.
परिणामी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थाचालकांवर संस्था बंद करण्याची वेळ आली आहे. यासाठी पारोळा तालुक्यातील इंग्रजी माध्यम शाळा च्या प्रतिनिधीने आपल्या मागण्या व अडचणी मांडण्यासाठी सदर निवेदन दिले. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी सदर निवेदन स्वीकारून शाळेच्या मागण्या व अडचणी वरिष्ठांना जिल्हास्तरावर कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी विजय गायकवाड बोहरा स्कूल पारोळा, विजय बाविस्कर राजीव गांधी स्कूल टेहू, बिपीन पाटील आयडियल इंग्लिश स्कूल पारोळा, तसेच गुरुकुल स्कूल सावखेडा, महावीर स्कूल आडगाव, करोडपती स्कूल पारोळा आदी खासगी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.