(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) गेल्या दीड दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक क्षेत्रात मुलांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. जगात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांला टिकायचे असेल तर त्यांनी कठोर परिश्रम व मेहनत घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री डॉ सतीश पाटील यांनी केले.
ते श्री शिवाजी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक जी. बी. पाटील, उपशिक्षक आर.एस. पाटील आधी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगांव मार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी आणि १२ वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यां मधून शाळेत प्रथम आलेल्या विदयार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. सन २०२०- २१ मध्ये श्री शिवाजी हायस्कूल या शाळेतून मागासवर्गीय विद्यार्थ्यां मधून साईनाथ शांताराम अवचिते हा विद्यार्थी प्रथम आल्याने त्यास संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री डॉ सतीश पाटील यांच्या हस्ते ५ हजारांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक जी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एन. पाटील, आभार कौस्तुभ सोनवणे यांनी मानलेत. यशस्वीतेसाठी वाय. टी. पाटील, पी. आर. पाटील, जे. एच. भोई, संदीप बोरसे, प्रसाद नावरकर यांनी परिश्रम घेतले.