(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शिरसोली रोडवरील मोहाडी शिवारातील श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. गुरूवार २२ जुलै २०२१ पासून सदर रुग्णालय कार्यरत होत असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली.
श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, मेंदुविकार, हृदय विकार, मधुमेह, नेत्ररोग विभाग, प्लॅस्टिक सर्जरी, मुत्र रोग शास्त्र, लॅप्रोस्कोपी सर्जरी, स्त्रीरो व प्रसुतीशास्त्र, जनरल जर्सरी, कॅन्सर सर्जरी, ऑर्थोपेडीक्स, बालरोग, ॲनेस्थेशिया, जळीत रूग्णांसाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब, एक्सरे सोनोग्राफी, पेडीयाट्रीक सर्जरी, मेडीयाट्रीक इंटरनसिव केअर युनिट (PICU), पेडीयाट्रीक व्हॅन्टीलेटर आणि अत्याधुनिक ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आदी सुविधा जनतेच्या सुवेधेसाठी उपलब्ध राहणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवार २२ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मोफत आरोग्य शिबीराचा पधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून गरजूं रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.
1) रुग्णांची मोफत तपासणी
2) महिलांसाठी प्रसूती साठी ५० % सवलत
3) सर्व प्रकारचे ऑपरेशन ५०% सवलत दिली जाणार आहे
यासाठी गरजू रूग्णांनी गुरुवार 22 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंधरवाड्याच्या उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे लाभ घ्यावा असे आवाहन गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी मेडीकल आणि आयुष हॉस्पिटलच्या संचालक मंडळांनी केले आहे.