(नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा) काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार अशी चर्चा आहे. या वृत्ताला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच माझ्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली तरी आदिवासी विकास खाते माझ्याकडेच राहील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पाडवी म्हणाले की, माझ्या बाबतीत उलट-सुलट चर्चा आहेत. याबाबत त्यांनी स्वतः बोलूनही दाखवले आहे. परंतु सात वेळा निवडून आलो तसेच यापूर्वी मंत्रीपद देखील नाकारले होते. यामुळे आदिवासी विकास खाते हे मला दिले आहे. आणि ते खाते पक्षातील सीनियर म्हणून माझ्याकडेच राहील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या विचारणा याआधीही केल्या आहेत. आता नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तो वाद सध्या सुरू आहे. अध्यक्ष बनविण्यासंदर्भात हायकमांड जो निर्णय घेईल तो मला तो मला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.