(राजमुद्रा अमळनेर) अमळनेर येथील समाजसेवक असल्याचा खोटा आव आणणाऱ्या राजेंद्र अग्रवाल यांचा मुलगा नगरसेवक निशांत अग्रवाल याला काल रात्री अंमळनेर पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात मुद्देमालासह अटक केली आहे. अंमळनेर येथील हॉटेल गारवा जवळ काही बड्या हस्ती लाखोंचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, गंभीर शिंदे, शरद पाटील व सहकारी टीम यांनी छापा टाकून संबंधित हॉटेल परिसरातील जुगार खेळणाऱ्यांना बेड्या ठोकल्या.
शहरातील ढोंगीपणाचा आव आणत स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे राजेंद्र अग्रवाल यांचा नगरसेवक असलेला मुलगा तसेच इतर आजी-माजी नगरसेवक व इतर गुंड प्रवृत्तीची टोळी हॉटेल गारवा परिसरात निवृत्त पोलिस कर्मचारी योगराज बडगुजर यांच्या नावे असलेल्या हॉटेल गारवा परिसरात बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ आपली सूत्रे हलवत या अट्टल जुगारूंना अटक केली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. या ठिकाणी असलेल्या काही काही बड्या हस्ती या टीप मिळाल्यामुळे आधीच पसार होण्यात यशस्वी झाल्या. पोलीस त्याचा तपस करीत आहेत.
पोलिसांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून हॉटेल गारवाचे योगराज बडगुजर यांचा या धंद्यात भागीदारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने पुढील तपस सुरू आहे. देवाच्या नावाखाली लोकांना समाज सेवा करायला लावणाऱ्या निशांत अग्रवालचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला अशी चर्चा अमळनेरात सध्या सुरू आहे.