(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) २०१९-२० या वर्षातील हवामानावर आधारीत केळी फळ पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा न करणाऱ्या नऊ बॅंकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी ७ जुलै ला तालुका तक्रार निवारण समितीला दिले. परतुं आठ ते दहा वेळा बैठका तीन वेळा मुदतवाढ देऊनही टाळाटाळ करीत आहे .
विमा कंपन्या शेतकऱ्याची हेळसांड करीत असतात. बॅका तालुका स्थरावरील तक्रार सामितीचे अध्यक्ष, तहसिलदार व सचिव तालुका आधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. तहसिलदार व तालुका कृषी अधीकारी शासनाचा अश्या पध्दतीने जर कारभार चालत असेल तर शेतकरी अथवा सामान्य नागरीकांनी कोणाकडे दाद मागावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॅकेची मनमानी पिक विमा कंपन्यायी कदापी सहन केली जाणार नाही असे सांगून पाच ते सहा दिवसात पिक विमा कंपन्याची नुकसानीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा न झाल्यास तालुका कृषि कार्यालयाला २६ जुलै रोजी कुलप ठोकुन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहारचे अविनाश पाटिल यांनी दिला आहे.
याबाबत रावेर नायब तहसिलदार सी जी पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अविनाश पाटील, विकास पाटील, मनोज वरणकर, शे लतीफ शे समद, निलेश पाटील, गौरव पाटील, विजय चौधरी, कयामुउद्दीन जयनुदी, शे समीर, शेख शकील व कार्यकर्तें उपस्थित होते.