(राजमुद्रा वृत्तसेवा) कि. सो. क. न्यू सिटी हायस्कूलचा नाशिक विभागाकडून घेण्यात आलेल्या सन २०२०-२०२१ एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. परीक्षेत ७५ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ११७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेत प्रथम- हर्षल अजय पाटील ९६.८० गुण, द्वितीय- साई विजय बागुल ९४.८० तर तृतीय- वरुण गुलाब बिरारी ९२.८०, चतुर्थ- हर्ष सोज्वळ भामरे ९२.६० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच शाळेतून ९ विद्यार्थी शेकडा ९० व ९० पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, उपाध्यक्ष डॉ. महेश घुगरी, मानद सचिव संतोष अग्रवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. जोशी, उपमुख्याध्यापक एस. पी. वाघ, पर्यवेक्षक जे. पी. कुयटे व सौ. जे. जे. जोशी व शाळेतील सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.