(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावरुन निशाणा साधत पुन्हा आपले टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत असा टोला संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर वरून लगावला आहे.
संदीप देशपांडे म्हणतात, ” हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..”
मंत्री उद्धव ठाकरे आशादी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला रवाना झाले. काल रात्री ९ च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली. पाहटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही महापूजा पार पडली.