(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा) चांगली कामे करा मी तुमच्या घरी जेवायला येईल असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. जो शाखाध्यक्ष चांगले काम करेल त्याच्या घरी आपण स्वतः जेवायला जाणार आहोत असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितल्याने मनसे शाखा अध्यक्षांचा उत्साह वाढला असल्याचे चित्र दिसून आले आहे.
पुण्यातील आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष हेच स्वतः तीन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. राज ठाकरे म्हणाले, प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच जो शाखाध्यक्ष चांगले काम करेल त्यांच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार आहोत, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.