(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) माजी मंत्री तथा भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील हे दिनांक 22 व 23 जुलै रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान दि. 22 जुलै रोजी खोटे नगर व मानराज पार्क जवळ भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या सर्व मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आ. राजू मामा भोळे भाजपा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह सर्व आघाडीतील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहा वाजता खोटेनगर स्टॉपजवळ उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.