(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) ईद हा सण साधेपणाने उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी मुस्लिम वस्तीतील गल्लोगल्लीत आणि घराघरांमध्ये ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांसह ईदची नमाज अदा केली. जळगाव मुस्लिम इदगा व कब्रस्तान ट्रस्टचे सचिव फारुख शेख यांनी आपल्या हाजी अहमद नगर येथील निवासस्थानी नमाज अदा करून दुवा केली.
दरम्यान, मुस्लिम समाजातील लहान बालके, महिला व पुरुषांनी ईद निमित्त ईद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईद उल फितर व ईद उलजहाँ आणि रमजान व बकरी ईद यांची नमाज दरवर्षी ईदगाह मैदानावर पठण केली जाते. परंतु कोरोनामुळे यावेळी देखील मुस्लिम समाजाने आपापल्या घरोघरी ईदची नमाज पठण केली. कोरोना संकटापासून सर्वांना वाचवा म्हणून मुस्लिम समुदायाने अल्लाकडे साकडे घातले. कुर्बानी केलेल्या वाटेतून एक वाटा गरीब लोकांना वाटप करण्यात आला. ईद साधेपणाने परंतु उत्साहाने साजरी करण्यात आली.