(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) मध्यप्रदेश आयुर्विज्ञान परिषद म्हणजेच मेडिकल कौन्सिल भोपाळच्या सल्लागारपदी आरोग्य दूत रामेश्वर पुनमचंद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र मध्यप्रदेश मेडिकल कौन्सिलचे आयुक्त यांनी दिले आहे.
आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांना सेवा निशुल्क प्रदान करण्यात आली असून, मुंबई ते भोपाळ येण्या-जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था मध्यप्रदेश मेडिकल कौन्सिल कडून केली जाणार आहे. रामेश्वर नाईक हे गोद्री तांडा ता. जि. जळगाव येथील रहिवासी असून भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. भाजपा सरकारच्या काळात नाईक यांनी जळगाव नंदुरबार नाशिक फैजपूर बीड आदी ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेऊन सेवा बजावली आहे. तसेच मुंबई आरोग्याच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.