(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) धुळे इनरव्हील क्लब, धुळे क्रॉसरोडची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. इनरव्हील क्लब, धुळे क्रॉसरोडच्या मावळत्या अध्यक्षा क्षिप्रांजली काळे यांचेकडून नुतन अध्यक्षा भारती अनिल अहिरराव यांनी डिस्ट्रिक्ट ३०६ जिल्हा अध्यक्ष पदग्रहण समारंभात कार्यभार स्विकारला.
इनरव्हील ही महिलांची राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण पूरक लोकहिताचे कार्यक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असतो. याप्रकारचे उपक्रम राबविण्याकरिता सन २०२१-२२ ची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
सचिव अनुषा सोनवणे, उपाध्यक्षा स्मिता विसपुते, आयपीपी क्षिप्रांजली काळे, ट्रेझरर मनिषा पाटील, आय एस ओ शर्मिला पाटील,एडिटर दिपाली शिंदे अशी कार्यकारणी गठीत करण्यात आली. भारती अहिरराव व नुतन कार्यकारिणीने येत्या काळात विविध लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. सौ.भारती अनिल अहिरराव यांच्या नियुक्तीने सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.