जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जळगाव सुवर्णबाजारात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या भावात घसरण होताना पाहायला मिळत आहे, सोन्याचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असताना अचानक दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोने प्रती १० ग्रम ४८,300 रुपये इतका आहे, तर चांदीचा भावात घसरण होऊन आज एक किलो चांदीचा भाव ६७ हजार रुपयांवर आला आहेत.
गेल्या अनेक वर्षा पासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सातत्याने होणाऱ्या चढ उतारांचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे. परिणामी सोने-चांदीच्या दरातील चढउतार अजूनही सुरूच आहे. मुळात सुवर्णबाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सातत्याने होत असलेल्या चढउताराचा परिणाम सुवर्णबाजारावर होत आहे. सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दरातील चढउतार अजूनही सुरूच आहे. सुवर्णबाजारपेठेत आलेली अस्थिरता यामुळे सोने व चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मुळात गत वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता अर्थात मागील अकरा महिन्यात जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे.