(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) लग्नाला अवघे दहा दिवस झाले, संसाराची अजून सुरुवात झाली असताना, हातावरची मेहंदी पुसण्या अगोदर विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील दांडेकर नगरात घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, न्हावी तालुका यावल येथील माहेर असलेल्या करीना सागर निकम (वय १९) या तरुणीचा विवाह गेल्या आठवड्यात ११ जुलैला जळगावातील दांडेकर नगर मधील सागर निकम यांच्याशी झाला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. करीना सागर निकम हिने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी तिचे सासरे, पती कामावर गेले होते तर दीर घरात झोपलेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.