(राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात बहुतांश भगत मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनची घोषणा केली गेली असून कोरोनाच्या महामारीवर संतुलन ठेवण्याचा प्रयत्न चालू असलेला दिसून येत आहे. अशातच नाशिकमध्ये 12 मे ते 22 मे या काळात लॉकडाऊन जाहीर केले गेले असून नागरिकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
कोल्हापुरातही येत्या एक दोन दिवसात 14 दिवसांचे लॉकडाऊन लावणार असल्याची शक्यता हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या अनुषंगाने जवळ जवळ अर्धा महाराष्ट्र हा लॉकडाऊन करण्यात आला असल्याचे निदर्शनास येते. लोकडाऊन मध्ये आत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.