(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) नाशिक विभाग ग्रंथालय संघाची धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आश्रम शाळेत वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष अँड संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी अनेक विषयावर चर्चा करून कार्यकारिणीची मुदत संपल्याने डॉ. दत्ता परदेशी यांची अध्यक्षपदी तर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सतीश पाटील यांची नाशिक विभागावर कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली .
या प्रसंगी कार्यवाहक धुमाळ, चाळीसगाव यांनी अहवाल वाचन करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. कार्यकारी मंडळाची मुदत तीन वर्षांनी संपल्याने पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डॉ. दत्ता परदेशी (धुळे), कोषाध्यक्षपदी सतीश पाटील (जळगाव ), कार्यवाहकपदी प्रवीण पाटील (नंदुरबार), अजय शहा (कार्याध्यक्ष नाशिक) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पाचही जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे शाल श्रीफळ पुष्पहार घालून माजी अध्यक्ष अँड. संभाजी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल सोनवणे (जिल्हाअध्यक्ष धुळे), राहुल महिरे (कार्यवाहक धुळे), पी. एम. पाटील (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष), संजय पाटील (जिल्हा कार्यवाह जळगाव), किशोर पाटील (शेतकरी संघटना तालुका प्रमुख पारोळा), शशिकांत पाटील (अमळनेर), रवी दादा (धरणगाव), संगीता पाटील, मनोज पाटील (पारोळा), मोरे (चोपडा), यशोद (चाळीसगाव), अविनाश भदाणे (धुळे) आ.ओ.पाटील (धुळे) रोहिदास हाके, हि .रा . चौधरी, भरत रोकडे सर्व धुळे, शहा (नाशिक) आदींची उपस्थिती होती.