(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) व्यसनांमुळे दुर्दशा सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे युवकांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक समाजात जनजागृती झाली पाहिजे. मागासवर्गीय समाजात सधन व उच्च शिक्षितांनी शिष्यवृत्ती नाकारली पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग आपल्या इतर भावंडाना होईल अशी मानसिकता देखील जोपासली पाहिजे. तसेच नव तरुणांना व्यसनांपासून लांब करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
पारोळा येथे नगर पालिकेच्या सभागृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेतर्फे काढण्यात आलेल्या नवनिर्धार संवाद अभियान अंतर्गत निघालेल्या यात्रेच्या निमित्ताने समाज बांधव व युवकांनाही यात सवड साधला. यावेळी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षा अँड कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, जळगावचे अमित पाटील, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, गटनेते बापू महाजन, नगरसेवक मनिष पाटील, संजय पाटील, नवल चौधरी, गौरव बडगुजर, पी. जी. पाटील आदी उपस्थित होते.