‘
(ठाणे राजमुद्रा वृत्तसेवा) मुरबाड तालुक्यातील देवगांव येथे रहाणाऱ्या जनाबाई मंगल अहिरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने मुरबाड तालुक्यातील देवगांव येथे ‘आई’ या विषयावर कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी ‘आई’ या विषयावर कविता सादर करून आई बद्दल असलेले प्रेम, आदर, भावना कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केले.
या कवी संमेलनासाठी कवी वसंत हिरे (मुलुंड), नवनाथ रणखांबे (कल्याण), जगदेव भटु (भिवंडी), शाम भालेराव (कल्याण) कवयित्री मनीषा मेश्राम (कल्याण) कामिनी धनगर (दहिगाव) प्रज्ञा अहिरे (देवगांव) उपस्थित होते. विविध कवितेतून आईच्या बहारदार कविते बरोबर प्रबोधनात्मक कविता उपस्थितांना ऐकण्यास मिळाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार मंगल अहिरे यांनी तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत हिरे यांनी केले. यावेळी अहिरे परिवातील सदस्य गोरखक्षनाथ अहिरे, सोनम अहिरे, नरेश अहिरे, गुलाब साबळे, नयना रोकडे, कामिनी धनगर, प्रज्ञा अहिरे, बळीराम अहिरे, सुप्रिया अहिरे, अनिता अहिरे, मनोज अहिरे उपस्थित होते.