(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शिरसोली रोडवरील मोहाडी शिवारातील ‘श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी मेडिकल आणि आयुष हॉस्पिटल’ अत्याधुनिक सोयी सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. दरम्यान या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग मेंदुविकार, हृदय विकार, मधुमेह, नेत्ररोग विभाग, प्लॅस्टिक सर्जरी, मुत्र रोग शास्त्र, लॅप्रोस्कोपी सर्जरी, स्त्रीरो व प्रसुतीशास्त्र, जनरल जर्सरी, कॅन्सर सर्जरी, ऑर्थोपेडीक्स, बालरोग, ॲनेस्थेशिया, जळीत रूग्णांसाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब, एक्सरे सोनोग्राफी, पेडीयाट्रीक सर्जरी, मेडीयाट्रीक इंटरनसिव केअर युनिट (PICU), पेडीयाट्रीक व्हॅन्टीलेटर आणि अत्याधुनिक ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आदी सुविधा जनतेच्या सुवेधेसाठी उपलब्ध आहेत.
ना अजित दादा पवार यांचा जल्लोष
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मोफत आरोग्य शिबीर पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह रुग्णालय परिसरातील व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. तसेच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महिलांकरिता प्रदूषण प्रसूतीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंधरवड्याच्या उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा, असे आव्हान गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी आणि आयुष हॉस्पिटलच्या संचालक मंडळांनी केले आहे.