(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील त्यांच्या देवगिरी निवासस्थानी जिल्हा मजूर फेडरेशन तर्फे राष्ट्रवादी वेल्फेअर फंडला ५० हजाराचा धनादेश देण्यात आला.
तसेच, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, उपसभापती प्रकाश पाटील, विनोद देशमुख, मोविकोराज कोल्हे, जि प माजी सदस्य कैलास चव्हाण, मनोज वाणी आदी उपस्थित होते.