जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका विमान दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाली होती. तिला रुग्नवाहीकेपर्यंत नेण्यासाठी बांबूची झोळी तयार करण्यात आली होती. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिला विमलाबाई भिल यांनी स्वतःच्या अंगावरील साडी फाडून मदतकार्य केले होते. याची तात्काळ पोलिसांनी दखल घेऊन तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, दि. १६ जुलै रोजी वर्डी परिसरात दुपारच्या वेळी टू सीटर विमान कोसळले होते. स्थानिक रहिवाश्यांनी प्रयत्न करून यावेळी प्रशिक्षणार्थी पायलट अंशिका गुजर व पायलट कॅप्टन मुगल अमीन यांना बाहेर काढले होते. जखमींना घटना स्थळापासून तीन किलोमीटर दूर रुग्नावाहीकेपर्यंत नेण्यासाठी बांबूची झोळी करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित विमलबाई हिरामण भिल (वय ६१) यांनी त्यांच्या अंगावरील साडी फाडून दिली होती. विमलबाई भिल यांनी तत्काळ समयसूचकता दाखवून अंगावरील साडी फाडून दिल्याने तिच्या या समयसूचकतेची दाखल घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचने नुसार सदर महिलेचा साडी, चोळी, पुष्पगुस्च्छ देरून सत्कार करण्यात आला.