रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर येथील पंचायत समिती सभागृहात ऑलिम्पिक जागरण अभियान अंतर्गत युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि विविध शिक्षण संस्था व क्लब तर्फे आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात महाराष्ट्रातील १० खेळाडू सहभागी आहेत. त्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती सभागृहात रावेर येथे बॅनर व सेल्फी पॉईंटचे अनावरण करण्यात आले. तसेच ऑलिंपिक अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उदघाटन पंचायत समिती सभापती कविता कोळी, महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी शैलेश धनके, गटसमन्वयक खलील तडवी, हरलाल कोळी, संदिप सावळे, रुची मोटर्सचे संचालक अरुण अग्रवाल, मुख्याध्यापक बी. एस. मराठे, उपमुख्याध्यापक टी. बी. महाजन, केंद्रप्रमुख गणेश धांडे, शिक्षण विभागाचे प्रफुल्ल मानकर, रावेर तालुका क्रिडा समन्वयक ए. पी. पाटील उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अभिषेक महाजन, भावेश महाजन यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरदार जी. जी. स्पोर्टचे युवराज माळी, अजय महाजन, स्वामी स्पोर्टचे श्रीकांत महाजन, चिनावल हायस्कूलचे डी. आर. नेहते, ए. पी. पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष एम. एस. महाजन यांनी केले.