जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील पोलीस शिपाई व पोलीस नाईक अशा प्रवर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतीच याबाबत यादी जाहीर केली आहे. त्यानुसार ८९ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी तर १२० पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदी बढती मिळाली आहे.
याबाबतची अधिकृत यादी जिल्हा पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे. पदोन्नती समितीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपाधीक्षक दिलीप पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापन लिपिक दीपक जाधव, सुनील निकम यांचा समावेश होता. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.