नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा । तिन्ही पक्षातील नेते एकमेकांची कुरघोडी काढून मीडिया ट्रायलमध्ये वेळ घालवीत आहे, त्यामुळे येत्या तीन महिन्यात औबीसींचा इम्पेरिअल डाटा तयार केला नाही, तर महाआघाडीचा मंत्र्यांना भाजप रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे महामंत्री व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार येथे दौऱ्या प्रसंगी दिला आहे.महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकाची आटो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा ठपका माजी मंत्री बावनकुळे यांनी ठेवला आहे.
महाविकास आघाडी सरकारने वेळेत डाटा न्यायालयात सादर केला नाही. उलट ते केंद्र शासनाकडून डाटा मागत आहेत. त्यात ६९ लाख चुका आहेत. त्यापेक्षा तीन महिन्यात नवीन इमेरिअल डाटा तयार होऊन सादर येणे शक्य आहे. असल्याचे बावनकुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
भाजपच्या युवा मोर्चातर्फे युवा वॉरिअर अभियान राज्यभर राबविले जात आहे. त्यानिमित्त गुरूवारी श्री.बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश संघटन चिटणीस अनुप मोरे व पदाधिकारींचा ताफा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. . यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात एकही पालकमंत्री काम करत नाहीत. मंत्री पदाचा वापर केवळ स्वतःचा मतदार संघासाठी करीत आहेत. एक हजार कोटीचा तांदूळ घोटा झाला, आता रेशनचा तांदुळही या सरकारला पुरला नाही, असे या सरकारचे काम आहे. पंढरपूरला तिन्ही पक्ष आले तरी तेथील जनतेने यांना नाकारले, तशीच स्थिती धुळे, नंदुरबार, जळगावमध्येही आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता यासरकारला नाकारल्याशिवाय राहणार नाही असे देखील बावनकुळे म्हणाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पाऊस नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी दुबार पेरणीसाठी हताश झाले आहेत. त्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान देणे दूर मात्र या सरकारचा मंत्र्यांना एकमेकांच्या उण्यादुण्या काढण्यातच वेळ पुरत नाही. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची गंभीर स्थिती आहे. नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.