(राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने 15 मे नंतरही 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असून अधिक पंधरा दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाकडून केली जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. परिणामी आजच्या तारखेला अर्धा महाराष्ट्र सध्या लॉकडाऊनच्या साखळीत जखडलेला असताना महाराष्ट्र राज्यात 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्टात लॉकडाऊन जाहीर केलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने वाढत्या लॉकडाऊनचा पर्याय राज्यसरकार अवलंबणार असल्याचे लक्षात येते.