भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा । देशात पेट्रोलचे दर शंभर रूपयेच्या वर गेले आहे दिवसेनदिवस पेट्रोल दर वाढत आहे.सर्व सामान्य नागरिकांना खिशाला कात्री लागतं आहे.भुसावळ मध्ये पेट्रोलचे दर 109 रू च्या वर आहे. मात्र अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून मा.ना.अजीतदादा पवार याच्या 62 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेट्रोल मध्ये 62 रू ची सूट हा उपक्रम राबविल्याने भुसावळकरांनी राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला पेट्रोल कमी दराने मिळत असल्याने यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरवर्षी अजीतदादा पवार यांचा वाढदिवसाच्या जल्लोशात साजरा केला जातो पण कोरोनासारख्या भिषण अश्या आजारात मोठे कार्यक्रम घेण्यास बंदी असल्यामुळे आज पेट्रोल मध्ये 62रू ची सूट देऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रणजित चावरीया , युवक कार्याध्यक्ष विशाल ठोके यांनी केले होते शहर अध्यक्ष नितीन धांडे , गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस दुगेश ठाकूर , शोयेब शेख,तुषार चौधरी,सचिन पाटील,विजय भंगाळे,राहूल वाघ,समीर शेख,सिद्धाथ पगारे,रोहित पवार आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला आहे.