धुळे राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गरजूंनी आरोग्य तपासणी केली.
यावेळी शिबिराला जिल्हारुग्णालयातील डॉ. महेश भडांगे, डॉ.अश्विनी भामरे, डॉ. संजय शिंदे, प्रतिभा गोडगे, सुवर्ण सूर्यवंशी, अधिपरिचरिका कमलेश परदेशी, किशोर हलगिर, मनीष बाविस्कर, सुवर्णा चव्हाण, प्रीती कोळी, पूजा थोरात, डॉ.प्रियका म्हसने, डॉ.प्रियका सोनवणे, डॉ. नितीन पवार, डॉ.गीतांजली सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पावरा, शहराध्यक्षा सरोजताई कदम, शहर जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले, नवाब बेगमिर्झा, प्रदेश सचिव युवक सुमित पवार, कैलास चौधरी, माजी सभापती मनपा विरोधीपक्ष नेता कमलेश देवरे, वसीम मंत्री, रजनीश निंबाळकर, तरुणा पाटील, मिनाक्षी पाटील, रश्मी पवार, संजीवनी पाटील, स्वामीनी, रईस काझी, निलेश चौधरी माऊली राजेंद्र चौधरी, राजू सोळंखे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.