पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | पाचोरा शहराजवळ एक जीवंत काडतुस, एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा शहरातील हिवरा नदीलगत असलेल्या सारोळा बुद्रुक रोडवरील महादेव मंदिर परीसरात दोन युवक गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखा विभागाला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, हरीष परदेशी व उमेश गोसावी यांनी सापळा रचून महादेव मंदिर गाठले.
रात्री ८ वाजेच्या दरम्यान महादेव मंदिर परीसरात अशोक बाबुलाल पवार (वय २८) रा. सारोळा बुद्रुक ता. पाचोरा व सुरज नारायण शिंदे (वय ३०) रा. कृष्णापुरी, पाचोरा यांचे जवळ एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल असा ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एल.सी.बी पथकाने दोघा आरोपींना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत घोडसे हे करीत आहेत.