(राजमुद्रा वृत्तसेवा) अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवली जात आहे. अरबी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबामुळे हवामानात बदल होण्याची प्रक्रिया घडत आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका काहीही धोका नसल्याचे सांगण्यात आले असून मच्छिमारांना मात्र समुद्रात जाण्याची मनाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऋतुचक्रात फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येत आहे. याचा परिणाम पाहता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. असे असताना अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता दिसून येत आहे. निसर्गात होणाऱ्या विविध बदलांचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत असतो मात्र या बदलालाही बऱ्याच अंशी मानव जबाबदार असल्याचे नाकारता येत नाही.