जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरातील तांबापुरा भागातील सर्वसामान्य जनता हातावर पोट असणारी असून कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झालेले आहे. त्यांच्यासाठी लोक संघर्ष मोर्चाने दाखल घेऊन वेळोवेळी संबंधितांना निवेदन दिले आहे.
दरम्यान या भागातील दुकानदार नंबर ३८/१ यांनी कायम अंतोदय वाल्यांना ३५ किलो धान्य न देता चार किलो धान्य दिले आहे. तर अनेक जणांना रेशनकार्डवर पाच लोक असताना फक्त ७ किलो धान्य दिले आहे. या संबंधित दुकानदाराच्या तक्रारी होत्या. संबंधित दुकानदारांना ट्रकमध्ये अवैध धान्य भरताना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याचे दुकान निलंबित झाल्याने त्यांना दुसऱ्या दुकानाशी जोडण्यात आले. मात्र यांना जून व जुलैचे धान्य मोफत व विकत दोन्ही प्रकारचे अद्याप मिळालेले नाही.
ही बाब निषेधार्थ असून लोक संघर्ष मोर्चाने यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना घेराव घातला असता त्यांनी दुकानदाराशी प्रत्यक्ष बोलून उद्या कायद्याप्रमाणे देय असलेले धान्य वाटप करण्याचे आदेश दिले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, कैलास मोरे, मंगला सोनवणे, संगीता मोरे, देवाकाबाई ठाकरे, कल्पना गायकवाड, सुरेश बोरसे, लताबाई बोरसे, हिरामण मोरे, बाबू सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, तुळशीराम मोरे, शंकर बोरसे, आशा सोनवणे आदी उपस्थित होते.