(राजमुद्रा वृत्तसेवा) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर CBI चौकशी नंतर आता ED कडून गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई केली जाणार आहे. मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हा गुन्हा दाखल केला गेला असून याबाबतचे सर्व कागदपत्र ED ने आपल्या ताब्यात घेतले आहे. CBI ने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ED कडूनही गुन्हा दाखल केला गर्ल असतांना देशमुख मोठ्या अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सचिन वझे यांना 100 कोटीचे टारगेट देण्याविरोधात मागे देशमुखांवोरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याअंतर्गत मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी याबाबत तपासणी करून अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी दरम्यान सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. या आरोपाच्या विरोधात अनिल देशमुख हायकोर्टात आपली याचिका घेऊन गेले होते. मात्र हायकोर्टाने त्यांना याबाबत कुठलाही दिलासा दिलेला नसल्याचे दिसून आले.
आता मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED कडून गुन्हा दाखल केला असून चौकशी केली जाणार असल्याचे निदर्शनास येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता माजी गृहमंत्री देशमुख अडचणीत येणार असल्याची लक्षणे दिसून येते आहेत.