चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पातोंडा आणि चाळीसगांव येथे शिवसेना तर्फे शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, जळगांव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, चाळीसगाव शहर, उप.जिल्हाअध्यक्ष आर.एल. पाटील, जिल्हासन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव कलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, उप तालुका प्रमुख (तळेगाव) अनिल राठोड, उप तालुका प्रमुख (वाघळी), तुकाराम पाटील, उप तालुका प्रमुख (तरवाडे) नाना शिंदे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, उप शहरप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, महिला आघाडी उप.जिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला तालुका प्रमुख सविता कुमावत, एस. टी. कामगार सेनाप्रमुख दिलीप पाटील, युवासेना तालुका संघटक सागर पाटील, युवासेना शहरप्रमुख चेतन कुमावत, विभागप्रमुख शैलेंद्र सातपुते, उप.जिल्हासमन्वयक धर्मा काळे आदी उपस्थित होते. तसेच नवनियुक्त (अल्पसंख्याक) चाळीसगांव शहरप्रमुख वसीम चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.