गुलदस्ता (राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात संकट मोचन म्हणून ख्याती असलेले भाजपाचे नेते तथा माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट कोकणात महाड येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या या समयसूचकतेची सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परतेने दखल घेतली होती.
भारतीय जनता पार्टीने बचावकार्य आणि जास्तीत जास्त मदतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यात आघाडीचे राहिलेले नेते आ. गिरीश महाजन यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आलेल्या संकटावर मात करून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्याच्यात आपण देखील मागे राहता कामा नये यासाठी आमदार गिरीश महाजन यांनी कोकणात महाड येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे देखील त्यांच्या सोबत होते. त्यांनी पूर परिस्थिती काही प्रमाणात कमी झाल्यानंतर महाडची प्रत्यक्ष पाहणी केली. या परिसराची परिस्थिती खूपच विदारक आहे. खाजगी, सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण संकटातून सावरून उभे राहण्यासाठी मोठ्या परिश्रमाची पराकाष्टा करावी लागणार आहे. भाजपाने सर्वात आधी या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
आ. गिरीश महाजन यांचा दूरदृष्टीपणा, वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी घडलेल्या प्रसंगातून हे दिसून आले आहे. लहान असो किंवा मोठा असो याची तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आ. गिरीश महाजन मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात हे या घटनेवरून सर्वांना दिसून आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता घटनास्थळावर धाव घेऊन त्यांना मदतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे ओळखून जे नेते राजकीय वाटचाल करतात, त्यांनी केलेले कार्य आणि काम हे जनता ओळखून आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात आरोग्य सेवा, आरोग्यदूत ही संकल्पना राबवून त्यांनी आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक दीनदुबळ्या गोरगरिबांची सेवा केली आहे. अनेकांना नवीन जीवनदान दिले आहे. त्याची दखल तत्कालीन सरकारने देखील घेतली होती. आजही मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव जिल्हा यासारख्या शहरांमध्ये आरोग्यसेवा अद्यापही अखंडित सुरू आहे.