रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | गुरु ही करुणा आणि अनुभवाची मूर्ति असते. कारण मनुष्य हा कितीही दोषी किंवा नास्तिक असला तर त्याचा समाज काहीवेळा बहिस्कार करते. परंतु संत, गुरु हे आपल्या भक्ताची चूक वेळोवेळी क्षमा करुन करुणा व उत्कृष्ठ जीवन जगण्याची आणि वेळोवेळी सावध करण्याचे अनुभव देतात असे प्रतिपादन संत गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या दिनी ऑनलाईन सत्संगाच्या माध्यमातून साधक परिवाराला त्यांनी संदेश दिला. कार्यक्रमाला रावेर आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.