जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अल्पवयीन मयत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करावी व्हावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने केली आहे. दरम्यान या समितीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, करीना सागर निकम उर्फ करीना समाधान भालेराव या अल्पवयीन मुलींच्या इच्छेविरुद्ध सागर निकम रा. जळगांव यांचेबरोबर विवाह झाला होता. विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन माहेरुन पैसे आणावे या कारणाने मानसिक शारिरीक छळ सुरु होता. हा सदरचा त्रास असैह्य झाल्याने करीना हीने आत्महत्या केली. दरम्यान विवाहितेने आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला यांची चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतांना जळगांव जिल्हाध्यक्षा एँड. सिमा जाधव, कार्याध्यक्षा मनिषा पाटील, जिल्हा संघटक फिरोजा शेख, सुदीप पवार, जिल्हा सल्लागार हर्षल पाटील, महानगर प्रमुख इरफान शेख, भारती कापडणे, जिल्हा सल्लागार नसरीन पिरजादे, समितीच्या पदाधीकारी संगीता मोरे उपस्थित होते.