जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात शिवसेनेचे जनसंपर्क संघटन निर्माण व्हावे यासाठी कंबर कसली असून गाव तिथे शिवसेना हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी मोठ्या प्रमाणात संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने काही फेरबदल देखील केले आहेत. त्यानुसार डॉ. हर्षल माने यांना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे दिल्यानंतर शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढला आहे.
डॉ. माने यांनी दररोज शिव संपर्क अभियान अंतर्गत मेळावे, बैठका घेऊन तरुणांची चांगली फळी तयार केली आहे. अनेक तरुणांचे इन्कमिंग सुरू झाले असून तरुणांसाठी डॉ. माने हे गळ्यातील ताईत बनले. आहेत नुकत्याच चाळीसगाव येथे झालेल्या संपर्क बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासोबत जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, चाळीसगाव शहर उपजिल्हाध्यक्ष आर एल पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, उपतालुका प्रमुख तुकाराम पाटील, एसटी कामगार सेनेचे प्रमुख दिलीप पाटील, युवा सेनेचे तालुका संघटक सागर पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन कुमावत यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.