जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता युवा मोर्चा जळगांव जिल्हा महानगर युवा वॉरियर्सच्या भव्य शाखांचे सर्व शहरात भाजयुमोच्या मंडळांमध्ये उदघाटन झाले. जळगांव शहरात येत्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा ७६ युवा वॉरियर्सने भाजयुमोच्या शाखांचे उद्दीष्ट ठेवले आहे. भाजयुमो येत्या काळात ७६ शाखा उघडून १९०० युवकांना जोडण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता युवा मोर्चाने डोळ्यासमोर ठेवले आहे.
माजी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सुरेश (राजुमामा) भोळे, दीपक सूर्यवंशी, स्मिता वाघ यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. याप्रसंगी आनंद सपकाळे. भाजयुमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश पाटील, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, गणेश महाजन, सचिन बाविस्कर, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, रियाज शेख, चिटणीस अश्विन सैन्दाने, प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, कोशाध्यक्ष ऋषिकेश येवले, युवती प्रमुख अबोली पाटील, कार्यालयीन मंत्री भूषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, सोशल मिडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी, मंडल अध्यक्ष महेश लाठी, सागर पोळ, हर्षल चौधरी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पंकज गागडे, सागर जाधव, मायकल नेटलेकर, गणेश निबाळकर, जितेंद्र कुंभार, धनंजय पाटील, दीपक शिरसाठ, दर्शन काळे, भुषण आंबिकार उपस्थित होते.