रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर यावल मतदार संघासह मुक्ताईनगर भागातील पिक विम्याची रक्कम न देणा-या बँकांवर गुन्हा दाखल करुन शेतक-यांच्या बचत खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होणेबाबतचे निवेदन उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी महाराष्ट्र कृषी मंत्री दादा भुसे यांना नाशिक येथे दिले.
याबाबत सकारात्मक भूमिका कृषी मंत्री महोदयांनी घेतली असून, लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. दादाजी भुसे यांनी कृषी अधिकारी ठाकूर यांना तात्काळ निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. या वेळी अनिल चौधरी यांच्या सोबत नगरसेवक संजय आवटे, केदार सानप उपस्थित होते.