जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी चिपळूण पूरग्रस्तांची पाहणी केली. ते कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना भेटी देणार आहेत. त्यावर खासदार उमेश पाटील यांनी टोला लगावला आहे.
जळगाव येथील भाजपचे खासदार उन्मेष पाटील ट्विटरवर सक्रीय असतात. त्या माध्यमातून ते विरोधी पक्षावर टीका करीत असतात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर हॅण्डल वरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणतात कि, ‘किंबहुना आजचा दोन तासांचा दौरा आटोपला की झालं माझं काम… हूश्श… केंद्र सरकार आणि देवेंद्रजी बघून घेतील मदतीचे’, असे ट्विट करून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे.