बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | बोदवड शहराला पाण्यासाठी २० ते २५ दिवस तातकळत बसावे लागत असून बऱ्याचदा दीड महिना पिण्याचे पाणी मिळत नाही. संभांधित प्रशासन व लोकतिनिधी यांच्या कडून बोदवड वासीयांना ६ दिवसाच्या फरकाने पाणी देण्यासंदर्भात दिवास्वप्न दाखवले जाते. सध्यस्थितीतही भर पावसाळा असतांना बोदवड शहरात मागील २० दिवसांपासून पिण्याचे पाणी आलेले नसल्याने भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे बोदवड वासीयांना नियमित किमान ७ दिवसाच्या फरकाने पाणी देण्यात यावे आणि याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास भाजपा येत्या ३ ऑगष्ट २०२१ पासून बोदवड स्थित तहसील कचेरी समोरील गेटजवळ आमरण उपोषणाला बसून पाणी क्रांती करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, भा.ज.पा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, तालुकापाध्यक्ष विक्रमसिंग पाटील, शहराध्यक्ष नरेशआहुजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, कार्यकर्ते दिलीप घुले, संजय अग्रवाल, डॉ ब्रिजेश जैन, बुथ प्रमुख, सचिन जैस्वाल, भूषण देशमुख, दिनेश राजपूत, कृष्णा जाधव, सागर गंगतिरे, मधुकर मुळंतकर,निलेश देशमुख,रवींद्र चोरडिया,विनय मेटकर, मयुरेश शर्मा, राहुल माळी, संतोष बारी, महेंद्र पाटील, उमेश गुरव, जीवन माळी, भास्कर गव्हारे, पंकज चांदूरकर, राम आहुजा,मनूर ग्राम पंचायत सदस्य गजानन शेळके, परमेशवर मुके, संतोष चौधरी उपस्थित असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे बोदवड़ तालुका मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी राजमुद्राला दिली.